Big News : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुका लवकरच होणार हे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
चंद्रकांत पाटील म्हणाले, Dpdc चा 99% टक्के निधी खर्च करण्यात यशस्वी झालो आहे. काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर 31 ऑगस्टपर्यंत काढण्याच्या आदेश दिले आहेत. 112 कोटी रुपयांचा निधी आपल्याला वाढवून मिळाले आहेत. नियोजनच्या सदस्यांनी कामे सुचवण्याच्या सूचना देखील दिले आहे. 20 सप्टेंबरला आचारसहिंता लागेल हे अंदाज आहे तसे गृहीत धरून कामं करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याचा अंदाज आहे.
२० ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक ?
दरम्यान, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूक २० ऑक्टोबरला होईल असे सांगितले होते. मात्र, आता ही तारीख खरी ठरते का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.