---Advertisement---

Big News : खासदार उन्मेष पाटील पोहचले मातोश्रीवर

---Advertisement---

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून त्याजागी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे नाराज असलेले खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, संजय राऊत यांच्या भेटीसाठी उन्मेष पाटील मुंबईत पोहचल्याने जळगाव मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना उबाठा गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. त्यानुषंगाने खासदार उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार खासदार पाटील मुंबईला मातोश्रीवर दाखल झालेले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment