Big News : नंदुरबारात २ फेब्रुवारीला राजकीय भूकंप; कुणी केला दावा ?

नंदुरबार : आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत अनेक ठिकाणी राजकीय भूकंप पाहायला मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनीही दावा केला आहे.

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच नंदुरबार जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी केला आहे.

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होत आहे. या उद्घटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येत असून नंदुरबारला उपस्थिती लावणार  आहेत. कार्यकर्यांकडून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे.

काही जाहीर कार्यक्रम व पक्षाचे कार्यक्रम देखील नियोजित आहेत. अजित पवार यांच्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक मोठ्या राजकीय पक्षातील मोठ्या पदधिकारी यांचा प्रवेश सोहळा आणि राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. दुपारी २ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत अजित पवार जिल्ह्यात राहणार आहेत. या जिल्ह्यातून ते पक्षवाढीसाठी कुणाला सोबत घेतात आणि काय राजकीय खेळी करतात; याकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागून आहे.