मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची पदयात्रा मुंबईकडे कूच करत असताना गर्दीही वाढत आहे. जरंगे आपल्या मागणीवर ठाम असून मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यासाठी आंदोलन करत आहेत.
मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईतच उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस बजावली आहे. आझाद मैदानाची क्षमता ५००० आंदोलकांची आहे. त्यापेक्षा अधिक आंदोलक मुंबईत येऊ शकत नाहीत, असे या नोटीशीत सांगण्यात आलं आहे. मात्र, मुबई पोलिसांनी नोटीस बजावली असली तरी मनोज जरांगे काय निर्णय घेतात ? हे महत्वाचं ठरणार आहे.