Big News : रावेर मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षात बंड ? माजी आ. संतोष चौधरी अपक्ष…

xr:d:DAFtd8oCXa8:2644,j:8961461986278550671,t:24041210

Raver Lok Sabha : रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे उद्योगपती श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अशातच रावेर मतदारसंघात शरद पवार गटात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौकशी हे नाराज असून, अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

श्रीराम पाटील हे जिल्ह्यात एक उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते रावेकर लोकसभा मतदारसंघात अग्रस्थानी असून, ते काही काळापूर्वी अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत असल्याचंही म्हलं गेलं. अजित पवारांचा दौरा लांबला आणि श्रीराम पाटील यांचा प्रवेशही.

पुढे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अखेर शरद पवार गटावर येऊन त्यांच्या या राजकीय प्रवेशाच्या प्रवासाला विराम मिळाला. मात्र, ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी नाराज असून, अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवाय, याबाबत माजी आमदार संतोष चौधरी हे सोमवारी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.