Rohit Sharma : खराब फॉर्ममुळे रोहित शर्माचा मोठा निर्णय, खेळणार ‘या’ खेळाडूच्या नेतृत्वात!

Rohit Sharma :  टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांमध्ये सातत्याने अपयशी ठरल्यावर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

जवळपास दहा वर्षांनंतर रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून खेळणार आहे. मात्र, कर्णधार म्हणून नव्हे, तर एक खेळाडू म्हणून तो संघाचा भाग असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या संघात अजिंक्य रहाणे कर्णधारपद सांभाळणार आहे.

हेही वाचा :  डॉक्टर तरुणीने क्लिनिकमध्येच संपवलं आयुष्य, समोर आलं धक्कादायक कारण

रोहित शर्माचे आता फक्त वनडे आणि कसोटीवर लक्ष

टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या त्याचा फॉर्म वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कसोटी सामने लक्षात घेता, रोहितसाठी रणजी ट्रॉफीमधील जम्मू काश्मीरविरुद्धचा सामना निर्णायक ठरू शकतो.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबईचा रणजी संघ (जम्मू काश्मीरविरुद्ध)

  • कर्णधार: अजिंक्य रहाणे
  • खेळाडू: रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, तनुश कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, रॉयस्टन डायस, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, हर्ष कोठारी. 23 जानेवारीपासून एमसीए-बीकेसी ग्राउंडवर होणारा पहिला सामना रोहितच्या फॉर्मसाठी निर्णायक ठरेल.