अमरावती : बळीराजा विदर्भ संघटनेच्या या आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी संघटनेकडून लाँग मार्च काढण्यात आला होता. मोर्चेकरी शेतकरी नागपूरच्या दिशेने जात होते. यावेळी अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा तेथून जात होता. त्यावेळी आंदोलकांनी अजित पवार यांचा ताफा अडवत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
दरमयान पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना बाजूला केलं आणि अजित पवारांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून दिला.
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटना आक्रमक झाली आहे.