Kisan Samman Fund : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १३ व्या हप्त्याची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपये वार्षिक मिळतात. केंद्र सरकार ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत वर्ग करणार आहे. म्हणजेच वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पैसे पाठवले जातात. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात २००० हजार रुपये मिळतात.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता १३ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतने वाट पाहत आहे. अशातच, १३ वा हप्ता कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून १३ व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
पीएम किसानचा १३ वा हप्ता कधी मिळणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेअंतर्गत तेरावा हप्ता २७ फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल.