जळगाव : पाळधी ते नाचणखेडादरम्यान एसटी बस पलटी झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रानुसार, जिल्ह्यातील पाळधी-नाचनखेडादरम्यान वाघुर नदीच्या पुलावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात विद्यार्थी आणि प्रवासी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या बसमध्ये वाहक सैतवाल तर चालक अमोल पाटील हे कार्यरत होते. त्यांनी बसमधून प्रवाशी आणि विद्यार्थी यांना बाहेर काढले. यावेळी पाळधी परिसरातील लोकांनी बचाव कार्यासाठी सहकार्य केले.
या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच जामनेर डेपोचे मॅनेजर कमलेश धनराळे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची सूत्रांनी सांगितले.