---Advertisement---

मोठी बातमी! क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर दगडफेक

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह ।१६ फेब्रुवारी  २०२३। मुंबई मधून एक बातमी समोर येतेय टीम इंडियाचा  क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. पृथ्वी शॉने सेल्फी  काढायला नकार दिल्याने आठ जणांच्या जमावाने त्याच्या कारवर हल्ला केला.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ओशिवरा परिसरात पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता. त्यावेळी तिथे काही जणं आली, त्यांना पृथ्वी शॉबरोबर सेल्फी काढायचा होता. पण पृथ्वी शॉने नकार देताच त्यांनी रागाच्या भरात पृथ्वीच्या कारवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात पृथ्वीला कोणतीही दुखापत झाली नाही. हल्ला झाल्यानंतर पृथ्वी शॉचा मित्र कार घेऊन ओशिवरा पोलीस स्टेशनला दाखल झाला. त्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 384,143, 148,149, 427,504, आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment