पहूरमध्ये पोलीसांची मोठी कारवाई, पकडला ६० लाखांचा गुटखा

पहूर : जामनेर तालुक्यातील पहूर येथील सोनाळा फाट्याजवळ आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी गुटखांचा ट्र्क पकडला. नाशिक विभागाच्या विशेष पोलीस पथाकाने ही कारवाई केली. यामध्ये ६० लाख ८० हजारांच्या गुटखासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक नाशिक यांनी नेमणूक केलेल्या  नाशिक पथकातील पोलीस निरिक्षक बापु रोहम ,अंमलदार एएसआय रविंद्र ईश्वर शिलावट, एएसआय बशीर गुलाब तडवी , पोलीस कर्मचारी प्रमोद मंडलीक ,मनोज दुसाने ,नारायण लोहारे यांच्यासह पहूर पोलीस स्टेशनचे एएसआय रविंद्र देशमुख व पोंकाॕ ईश्वर कोकणे यांनी पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा फाट्याजवळ आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

राज्यात बंदी असलेला  दिलबाग प्लस पान मसाला, ए प्लस तंबाखू दिल्ली येथून मुंबईकडे नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा फाट्याजवळ छापा टाकण्यात आला. यामध्ये आरोपी चालक शराफतअली हसन मोहम्मद वय ३० रा.चहलका जि.नुहू (हरीयाना), वाहन मालक इम्रानखान शहाबुद्दीन रा.घसेरा ,पलवल (हरीयाना), गोलू मॕनेजर व राजू भाटीया गुटखा मालक  रा,दिल्ली अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.