पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. महाविकास आघाडी आणि भाजपाने आपले उमेदवारी जाहीर केले असून, २६ फेब्रुवारीला या दोन्ही जागेसाठी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज कसबापेठ, चिंचवड निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
यादरम्यान मविआसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून संभाजी ब्रिगेडने कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागांसाठीच्या पोटनिवडणूकीतून माघार घेतली आहे तसेच आम आदमी पार्टीन देखील माघार घेतली आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आ. सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर अखेर संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.