तरुण भारत लाईव्ह ।१६ मार्च २०२३। मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतलीय. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला 58 हजारांवर गेलेला सोन्याचा दर गेल्या आठवड्यात 55 हजाराच्या घरात आला होता. मात्र आता पुन्हा 58 हजारावर गेला आहे. दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत सोन्यासह चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झालेली आहे. चला जाणून घेऊयात काय आहे आजचा प्रति तोळ्याचा भाव तरुण भारतच्या माध्यमातून.
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचं किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आज गुरुवारी सकाळी 22 कॅरेट सोन्याचा दर 53000 हजारांवर गेला आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58000 हजारापर्यंत गेला आहे. यापूर्वी बुधवारी सकाळी सोन्याचा दर 57,900 रुपयांवर होता. त्यात आता 100 रुपयांहून अधिकची वाढ दिसून येतेय. दरम्यान, सोमवारी सोन्याचा दर 57,200 होता. तर मंगळवारी 57,800, बुधवारी 57,900 प्रति 10 ग्रॅम इतका होता.
काल सकाळी स्थिर असलेला चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज चांदीचा प्रति किलोचा दर 68,000 हजारांवर गेला आहे. यापूर्वी काल बुधवारी सकाळी चांदीचा दर 66,800 रुपयावर विकला जात होता. मात्र त्यात एकाच दिवसात तब्बल 1200 रुपयांहून अधिकची वाढ झालेली दिसून येतेय.
दरम्यान, चार दिवसापूर्वी चांदीचा दर जवळपास 64,200 रुपये प्रति किलो इतका होता. मात्र आतापर्यंत त्यात तब्बल 3800 रुपयांची वाढ झालेली दिसून येतेय. ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात मोठी वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
दरम्यान, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असल्याचे दिसून येतेय.वर आज सकाळी सोन्याच्या दर 433 घसरून 57,903 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी 358 घसरून 66,941रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.