तरुण भारत लाईव्ह ।०४ फेब्रुवारी २०२३। पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. यामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. वाणी यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाणी जयराम ह्या लोकप्रिय हिंदुस्थानी गायिका आणि पार्श्वगायिका आहे. वाणी जयराम यांनी अलीकडेच एक व्यावसायिक गायिका म्हणून संगीत विश्वामध्ये ५० वर्ष पूर्ण केली. त्यांनी या कारकिर्दीत १०,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. ‘आधुनिक भारताच्या मीरा’ अशी देखील त्यांची ओळख होती. त्यांना 25 जानेवारी रोजी पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सूत्रानुसार काही दिवसांपूर्वी गायिका वाणी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. चेन्नईतील त्यांच्या निवास्थानी वाणी या मृतावस्थेत आढळून आल्याचे थाउझंड लाइट्स पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना नेमकी कशी घडली याविषयीची सविस्तर माहिती आणि मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.