Asia Cup 2025 : हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्य कुमार यांच्याबद्दल मोठी अपडेट


Asia Cup 2025 : आशिया कप ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, खेळाडूंची फिटनेस टेस्ट सुरू झाली आहे. दरम्यान, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट आली आहे.

हार्दिक पंड्या फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण होईल की नाही ? हे पुढील ४८ तासांत कळणार आहे. हार्दिक पंड्या फिटनेस टेस्ट देण्यासाठी आधीच बेंगळुरू येथील एनसीएमध्ये पोहोचला आहे. हार्दिक पंड्याने सोशल मीडियाद्वारे एनसीएमध्ये पोहोचल्याची माहिती दिली आहे.

श्रेयस अय्यरबद्दल अशी माहिती आहे की त्याने त्याची फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे. त्याची टेस्ट २७ ते २९ जुलै दरम्यान घेण्यात आली. श्रेयस अय्यरने २०२३ मध्ये त्याचा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पण तो आशिया कपमधून संघात परतण्याची शक्यता आहे.

तसेच भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल एक अपडेट आहे की तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याला बरे होण्यासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो. म्हणजेच तो फिजिओ आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आणखी एक आठवडा एनसीएमध्ये राहील. दरम्यान, या स्पर्धेसाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, कोण खेळेल आणि कोण नाही हे लवकरच आपल्या कळेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---