---Advertisement---
State Bank of India : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल आणि ऑनलाइन बँकिंग किंवा UPI वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. SBI ने घोषणा केली आहे की ते त्यांच्या अनेक डिजिटल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करणार आहे.
कोणत्या सेवांवर होईल परिणाम आणि कधी?
या नियोजित देखभालीदरम्यान, SBI चे UPI, YONO अॅप, इंटरनेट बँकिंग, NEFT, RTGS आणि IMPS सेवा काम करणार नाहीत. याचा अर्थ असा की तुम्ही या काळात YONO अॅपद्वारे कोणतेही व्यवहार करू शकणार नाही किंवा UPI द्वारे पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाही.
बँकेने सांगितले आहे की ही सेवा ११ ऑक्टोबर रोजी रात्री १:१० वाजता बंद होईल आणि पहाटे २:१० पर्यंत सुरू होईल. याचा अर्थ असा की या सेवा एकूण ६० मिनिटांसाठी खंडित राहतील. याबाबत एसबीआयने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
ग्राहकांनी काय करावे?
जर तुम्हाला पैसे पाठवायचे असतील, बिल भरायचे असतील किंवा कोणतेही ऑनलाइन व्यवहार करायचे असतील तर त्यांनी ११ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजण्यापूर्वी करून घ्यावे. तसेच बँक ग्राहकांना या काळात जवळच्या एटीएमचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय, यूपीआय वापरणाऱ्यांसाठी, यूपीआय लाईट सेवा या काळात कार्यरत राहील, ज्यामुळे तुम्हाला छोटे व्यवहार करता येतील.
तसेच, आपत्कालीन परिस्थितीत रोख रक्कम हातात ठेवणे हा एक शहाणपणाचा निर्णय असू शकतो. जर तुमचे दुसऱ्या बँकेत खाते असेल तर तुम्ही त्या बँकेच्या सेवा देखील वापरू शकता. काही दिवसांपूर्वी, ८ ऑक्टोबर रोजी अनेक ग्राहकांनी यूपीआय सेवांमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार केल्यानंतर एसबीआय हे देखभालीचे काम करत आहे.