तरुण भारत लाईव्ह । २७ फेब्रुवारी २०२३। भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचा देखील समावेश आहे. आता गांगुली यांच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, गांगुली यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा तयार असून लवकरच शुटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रानुसार मिळाली आहे.
आपण पाहिलं असेल कि सौरव गांगुलींच्याच नेतृत्वात टीम इंडिया आक्रमक झाली. गांगुलीनं अनेक युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं. यामध्ये विरेंद्र सहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, हरभजन सिंह, इरफान पठान, एम.एस धोनी यासारख्या खेळाडूंना गांगुलीनं संघात स्थान दिलं होतं. तसेच गांगुली आपल्या आक्रमक स्वभावामुळे देखील चर्चेत होते. सौरव गांगुली आपल्या खेळामुळे प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्ब्ल १३२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, भारताचे नेतृत्व करताना त्यांनी एक कर्णधार म्हणून मोठे योगदान दिले आहे.
आता गांगुली यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत असून गांगुलीच्या बायोपिकच्या स्क्रिपटला मंजुरी मिळाली आहे. या चित्रपटाची कथा तयार असून लवकरच शुटिंगला सुरुवात होणार आहे. तसेच माजी कर्णधार सौरव गांगुलीची भूमिका अभिनेते रणबीर कपूर साकारणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपटात दादाची भूमिका अभिनेते रणबीर कपूर साकारणार आहे. शिवाय अन्य क्रिकेटपटूंची भूमिका कोण साकारणार? याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.