Bird flu news : उरण पाठोपाठ नांदेडमध्येही बर्ड फ्लूचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील किवळा येथे मृत कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पशूसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंतर्गत, 10 किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पशूसंवर्धन विभागाने परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली असून नागरिकांना कोंबड्यांचे मांस योग्यप्रकारे शिजवून खाण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, प्रशासनाने लोकांना घाबरून न जाण्याचे आणि योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
लातूरमधील ढालेगावात 4000 पिल्लांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील ढालेगाव येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये 4000 हून अधिक पिल्लांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापूर्वी उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झाल्याने याबाबतची भीती अधिक गडद झाली आहे. प्रशासन सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे असून, बर्ड फ्लूच्या विषाणूची पुष्टी होण्याची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!
बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लू, ज्याला एव्हियन इन्फ्लूएंझा म्हणतात, हा विषाणूजन्य आजार आहे जो पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो. याचा H5N1 प्रकार मानवांमध्ये संसर्ग पसरवू शकतो. संक्रमित पक्ष्यांच्या लाळ, नाकातील स्राव किंवा घाणीच्या संपर्कातून हा आजार पसरण्याचा धोका असतो.
मानवांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे
ताप आणि थंडी वाजून येणे
स्नायू दुखणे आणि डोकेदुखी
श्वसनास त्रास आणि खोकला
नाक व हिरड्यांमधून रक्त येणे
डोळ्यांत जळजळ आणि पोटदुखी
बर्ड फ्लू रोखण्यासाठी महत्त्वाचे उपाय
संक्रमित पक्ष्यांपासून लांब राहा.
कोंबडीचे मांस व अंडी पूर्णपणे शिजवून खा.
स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयी पाळा.
जर आजाराची लक्षणे जाणवली तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
बर्ड फ्लूचा मानवांवर होणारा प्रभाव
मानवांमध्ये बर्ड फ्लूची लागण दुर्मिळ असली तरी ती जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे या आजाराची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे.