---Advertisement---
मुबारकपूर : शहादा तालुक्यातील आडगाव येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर बिरसा स्मारकाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बांधवांनी पारंपारिक पेहराव घालून, होळीचे नृत्य सादर केले. या प्रसंगी विविध मान्यवर यांच्यासह सरपंच, माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
आदिवासी दिनाचे उद्या कार्यक्रम
नंदुरबार : विश्व आदिवासी दिनानिमित्त शनिवार, दि. ९ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीसह समाजप्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि. ९ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो.
यानिमित्त दरवर्षी विविध संघटनांतर्फे रॅली काढली जाते. आदिवासी संस्कृती व परंपरांची झलक त्यातून दाखविली जाते. यंदादेखील रॅली काढण्यात येणार आहे. याशिवाय इतरही विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.