---Advertisement---

Nandurbar News : चारशे वर्षांपूर्वीच्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

---Advertisement---

नंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागातील चारशे वर्षांपूर्वीचे पुरातन संतांच्या श्रीराम मंदिरात रविवारी श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दर वर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीनिमित्त संतांच्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्तींची सजावट करण्यात आली. फुलमाळा आणि विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी बारा वाजेच्या सुमारास श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम फळांसह विविध फळांची रास घालण्यात आली. नवसाला पावणाऱ्या संतांचे श्रीराम मंदिरात चैत्र नववर्ष गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत दररोज विविध धार्मिक उपक्रम होत आहेत. रविवारी श्रीराम नवमीनिमित्त रात्री उशिरापर्यंत संतांचे श्रीराम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

रघुवंशी समाजातर्फे राम नवमीनिमित्त शोभायात्रा

नंदुरबार : रघुवंशी समाजाच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. डीजेच्या वाद्यावर प्रभू श्रीरामचंद्रांच्या गीतांवर शोभायात्रेत सहभागी भाविकांनी नृत्य केले तर महिलांनी गरब्यावर ठेका धरत जल्लोष केला. नंदुरबार शहरातील परदेशीपुरा भागात असलेल्या राम मंदिरापासून शोभायात्रेला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. शोभायात्रेत श्रीरामांवर आधारित विविध गाण्यांच्या नृत्यावर सहभागी भाविक चांगलेच थ्रीरकले होते. त्यानंतर शोभायात्रा जुन्या नगरपालिका चौकात आल्यावर महिलांनी गरबा खेळला. लहान मुलांसह तरुणांनी भगवा झेंडा खांद्यावर श्रीरामांच्या जयजयकार केला.
मिरवणुकीत शिवसेनेचे नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योगपती पृथ्वीराज रघुवंशी, उद्योगपती गिरीश रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष राजेश रघुवंशी, माजी नगरसेवक विलास रघुवंशी , निखिल परदेशी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालवीर चौकात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

नंदुरबार : शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर भागात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे रविवार 6 एप्रिल रोजी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बालवीर चौकात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शिरपूर येथील मर्चंट बँकेचे कर्मचारी नरसु उदीकर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार नगर पालिकेचे निवृत्त कर्मचारी पांडुरंग गवळी, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, संभाजी हिरणवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment