तरुण भारत लाईव्ह । ०१ फेब्रुवारी २०२३। बिर्याणी फक्त भारतातच प्रसिद्ध नसून इतर देशात सुद्धा आवडीने खाल्ली जाते. भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून बिर्याणी बनवली जाते. बिर्याणी घरी बनवायला अगदी सोप्पी आहे. बिर्याणी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
तांदूळ. कांदे, मटार, आलं, लसूण पेस्ट, टॅमोटो पेस्ट, पुदिना,दालचिनी,तेजपत्ता,लवंग,हिंग,मीठ,मिरची पावडर, पाणी
कृती
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून १०ते १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी घ्या त्यामध्ये तांदूळ, मीठ, तमालपत्र, दालचिनी, लवंग, आणि अर्धा चमचा साजूक तूप घालून सर्व सामग्री उकळवून घ्या. आता दुस-या एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन गरम करा. त्यात हिंग, जिरे, आलं-लसणाची पेस्ट, कांदे घाला. त्यानंतर त्यामध्ये भाज्या घालून ३ मिनिटे शिजवून घ्या. आता त्यात हळद, लाल तिखट, मीठ, वाटाणे, भाज्या मऊ होईपर्यंत सर्व सामग्री शिजवून घ्या. आता गॅसवर कोळसा गरम करुन तो एका वाटीत ठेवा. त्या कोळशावर साजूक तूपाचे थेंब सोडून ती वाटी पॅनमध्ये शिजवलेल्या भाज्यांवर ठेवून पॅनचे झाकण बंद करा.
आता एक बाऊल घेऊन त्यात भाज्यांचं मिश्रण घ्या व त्यावर शिजवलेल्या भाताची लेअर घाला. तयार झाली आहे आपली व्हेजिटेबल बिर्याणी! या बिर्याणीचा आस्वाद तुम्ही थंडगार कोशिंबीरीसोबतही घेऊ शकता.