---Advertisement---

BJP : भाजपमध्ये भरपूर स्पेस : चंद्रशेखर बावनकुळे

---Advertisement---

 BJP :  मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमच्यासोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असून पक्षात भरपूर स्पेस आहे, कुणालाही नाही म्हणणार नाही. अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर पक्षांतील नेत्यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रणच दिले.

 

जयंत पाटील यांच्याविषयीच्या चर्चेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत, ते कोणाच्या संपर्कात आहे, हे मला माहित नाही, परंतु ते माझ्या संपर्कात नाहीत.  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही असेच धोरण आहे.

 

भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्र प्रथम या भूमिकेतून काम करतो. भाजपा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याबाबत शपथ घेतली होती. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण महाराष्ट्र सरकार देईल, असा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment