Assembly Election 2024 । शेवटच्या दिवशी भाजपने जाहीर केले दोन उमेदवार

Assembly Election 2024 । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरचे काही तास उरले आहे. मात्र असे असतानाही महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आपले सर्व उमेदवार अजून जाहीर केलेले नाहीत. महाविकास आघाडीतर्फे १९ जागांवर, तर महायुतीतर्फे ६ जागांवर अद्याप उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. अशातच आता भाजपने दोन उमेदवार जाहीर केले आहेत.

उमरेडमधून सुधीर पारवे आणि मीरा भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना संधी देण्यात आली आहे. भापने पहिल्या यादीत ९९ उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्या यादीत २२ तर तिसऱ्या यादीमध्ये २५ उमेदवार जाहीर केले होते. आता आज आणखी दोन उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपच्या एकूण उमेदवारांची संख्या १ ४८ झाली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये भाजपच सर्वाधिक जागा लढवणार हे निश्चित झाले आहे.

महायुतीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत ७८ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काही भाजच्या नेतांचाही समावेश आहे. ज्यांनी निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. २८८ जगांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आज दोन उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये मोर्शीमधून अपक्ष उमेदवार देवेंद्र भुयार आणि पुण्यातील भोरमधून शंकर मांडेकर यांचा समावेश आहे. आतापर्यंत महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला ५१ जागा आल्या आहेत.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार २८ ऑक्टोबरपर्यंत राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात ३२५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.