---Advertisement---

स्वतःची गद्दारी लपवण्यासाठी उद्धव ठाकरे… भाजपचा थेट हल्लाबोल

---Advertisement---

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे भाजपला सत्ता भक्षक म्हणतात पण ते स्वत: हतबल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला कुणी गंभीरपणे घेऊ नये. स्वतःची गद्दारी लपवण्यासाठी उद्धव ठाकरे आरोप करत आहेत, असे म्हणत भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला होता, त्यावर भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी थेट हल्लबोल केलाय.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांच्यावर निशाणाही साधला आहे.उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या मी स्वतः शुभेच्छा दिल्यात आणि संदर्भातला एक पत्र सुद्धा मी त्यांना लिहिलं आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी नैतिकता सोडली आहे. एवढे दिवस सोबत राहुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. सोनिया गांधी यांच्याजवळ सुद्धा त्यांना जागा सुद्धा मिळणार नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. आमचं राजकारण डब्यात गेलं नाही. तर त्यांचं राजकारण जे आहे ते डब्यामध्ये गेलं आहे. ईडीसीबीआयची उद्धव ठाकरे यांना भीती वाटते. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी नीतिमत्ता सोडली. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले जे 40 आमदार निघून गेले. हे आमदार त्यांना सोडून गेले हे त्यांचं सगळ्यात मोठा अपयश आहे. बंद दारावर काय घडलं हे त्यांना देखील माहितीये आणि त्यामुळे त्यांनी अशा वल्गना करू नये, असं मुनगंटीवार म्हणालेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment