---Advertisement---

दुर्दैवी! अज्ञात वाहनाच्या धडकेत भाजपच्या उपसरपंचाचा मृत्यू, ग्रामस्थांना घातपाताचा संशय

---Advertisement---

जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत भाजपच्या उपसरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश पाटील असे मृत उपसरपंचाचे नाव असून, ही घटना मंगळवार, १ एप्रिल रोजी रात्री चाळीसगाव-धुळे महामार्गावर भोरस शिवारात घडली. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय ग्रामस्थांसह त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, १ एप्रिल रोजी रात्री उपसरपंच प्रकाश पाटील आपल्या दुचाकीने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान, त्यांना चाळीसगाव-धुळे महामार्गावर भोरस शिवारात एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय ग्रामस्थांसह त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.तसेच, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रकाश पाटील यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव पोलीस अधिकाऱ्यांकडून वाहन चालकाची कसून चौकशी केली जात आहे.

गावात शोककळा
मंगळवार, १ एप्रिल रोजी रात्री उशिरा उपसरपंच प्रकाश पाटील यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गावात शोककळा पसरली असून, गावातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment