---Advertisement---
पाचोरा, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी पाचोरा मंडळाचे वतीने पाचोरा शहरात दिनांक 14 ऑगस्ट 2025 गुरुवार रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा शहरातील सर्व राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, व्यावसायिक,व इतर संस्था आणि संघटना,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तमाम देशप्रेमी रहिवासी नागरिकांना यावेळी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे
स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑपरेशन सिन्दूर हे आपल्या देशाच्या इतिहासातील अभिमानाचं पान आहे.आपल्या शूर जवानांनी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तिरंग्याचा मान उंचावण्यासाठी प्राण पणाला लावून हे मिशन यशस्वी केलं.या विजयाचा अभिमान आणि आपल्या वीर जवानांच्या त्यागाचा सन्मान म्हणून, 14 ऑगस्ट गुरुवार रोजी पाचोरा शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन केल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहर मंडळाचे वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तरी पाचोरा शहरातील सर्वांनी सर्व राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, व्यावसायिक,व इतर संस्था आणि संघटना,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तमाम देशप्रेमी रहिवासी नागरिकांना मोठ्या संख्येने या तिरंगा रॅलीला उपस्थिती राहण्याचे राहून आपल्या देशाच्या सैन्याच्या अभिमान वाढवावा ही विनंती भाजपा पाचोरा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर तिरंगा रॅली ही १४ ऑगस्ट, गुरुवार रोजी सकाळी ८:०० वाजता एस.एस.एम.एम.कॉलेज, कॉलेज पासुन सुरू होणार असून छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे अटल भाजपा कार्यालय पाचोरा,हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे समारोप होणार आहे.