भाजपाच्या नेत्यानं उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

सोलापूर : शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यात वाद वाढले आहेत. रोजच कुणी ना कुणी एकमेकांवर टीका करत आहे. तसेच ठाकरे गटाकडून शिवसेनेसह भाजपवरही जोरदार निशाणा साधला जातो आहे. मात्र आता भाजपचे मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

कोणी उडवली खिल्ली?
मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. तर त्याचवेळी मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी काय काम केले, त्यावरूनही जोरदार टीका केली जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते फक्त फेसबुकवरच होते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची करमाळ्यात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते, मात्र ते फक्त फेसबुकवरचचे मुख्यमंत्री होते अशी खोचक टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडून फेसबुकवर काय सांगायचे माझे कुटुंब तुमची जबाबदारी आणि हे घरात बसायचे. तर यांची जबाबदारी आपण घ्यायची आणि लोक वाऱ्यावर सोडायची अशी खरमरती टीकाही त्यांनी यावेळी केली. करमाळा येथील स्वर्गीय माजी मंत्री दिगंबरराव बागल कृषी महोत्सवावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.