---Advertisement---

भाजप नेत्याने म्हटलं ते खरंच?, वाचा सविस्तर

---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अन्  एवढ्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपच्या गोटात प्रचंड हालचाली सुरु आहेत. काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे तर संजय राऊतांनीही मोठा दावा केलाया आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याची भाजपची तयारी असल्याचे संजय राऊत म्हणालेत. अजित पवार यांच्या मध्यंतरीच्या नॉट रिचेबल प्रकरणावरून चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल मोठं वक्तव्य केलं आहे. तुफान आ रहा है… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जिथे जातात, त्या ठिकाणी असंख्य राजकीय हालचाली सुरु होतात. शाह यांचे शनिवारी मुंबईत आगमन होतं आहे, त्यामुळेच ‘हे सर्व प्राणी घाबरलेत’ अशा आशयाचे वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त विरोधकांसाठीच नव्हे तर सत्ताधारी शिंदे-फडणवीसही अमित शहांसमोर आज मोठी परीक्षा देतील, अअसे म्हटले जातं आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment