फडतूस प्रकरण : भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना सांगितला शब्दाचा अर्थ, काय?

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडतूस असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता फडतूस या शब्दावरुन भाजप आक्रमक झाली आहे. फडतूस या शब्दाचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशामध्ये आता भाजप नेत्यांनीच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत त्यांना फडतूस या शब्दाचा अर्थ समजून सांगितला आहे.

कोणी सांगितला त्या शब्दाचा  अर्थ?  

भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी तर उद्धव ठाकरेंना घरकोंबड्या म्हणत त्यांनी केलेल्या फडतूसपणाची आठवण देखील करुन दिली. राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘उद्धव ठाकरे यांना फडतूस या शब्दाचा अर्थ कदाचित माहीत नसावा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दुष्मनांची गळाभेट करणारे हे स्वतः याचमुळे यांच्या घरातील नोकर चाकर, मंत्री आमदार, रक्ताचे नातेवाईक सगळे यांना सोडून गेलेत.’

तसंच, ‘कधी तरी असा मुख्यमंत्री पहिला जो अडीच वर्षे मुख्यमंत्री होता पण पाच वेळा तरी तासाभरात मंत्रालयात गेला. घर कोंबड्यासारखे अडीच वर्षे घरात बसून होता याला फडतूस म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांनी जी मदत केली होती ती आपण बंद केली यालाच फडतूसपणा म्हणतात.’, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.