त्रिपुरात भाजपाला बहुमत; मेघालयात त्रिशंकू परिस्थिती; जाणून घ्या प्रत्येक अपडेट

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मतदान पार पडलं. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकाल हाती येणार आहे. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टी (एनपीपी) आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत, नागालँडमध्ये भाजपा मित्रपक्ष असलेली एनडीपीपी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. एनडीपीपी ३७ जागांवर आघाडीवर आहे. तर, मेघालयात एनपीपी २६ जागांवर पुढं आहे. काँग्रेस ५ आणि भाजपा ६ जागांवर मेघालयात समाधान मानावं लागत आहे. अद्यापही मेघालयात स्पष्ट बहुमत कोणाला मिळालं नाही. त्रिपुरात भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं दिसत आहे. भाजपाने बहुमताला लागणारा ३१ चा आकडा पार केला आहे. भाजपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) ११ आणि टिपरा मोथा पार्टी ११ जागांवर पुढं आहे.

त्रिपुरात पुन्हा एकदा भाजपा आघाडीवर
भाजपा – ३०
टिपरा मोथा पार्टी – ११
कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) – ११
काँग्रेस – ६

मेघालयात एनपीपी पक्ष आघाडीवर
एनपीपी – २०
भाजपा – ६
काँग्रेस – ६
टीएमसी – ५
टीपीपी – ६

नागालँडमध्ये सत्ताधारी एनडीपीपी पक्षाची आघाडी कायम
एनडीपीपी – १८
भाजपा – ८
काँग्रेस – ५
एनपीपी – १
जनता दल ( युनायटेड ) – २