नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यावर एका कावळ्याने संसदेत हल्ला केला. यादरम्यान ते फोनवर बोलत होते. मंगळवारी घडलेल्या या घटनेचे फोटो आज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
दरम्यान, दिल्ली भाजपने राघव चढ्ढा यांच्यावर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने लिहिले की, ‘कावळ्याने लबाडाला चावले… आजपर्यंत मी फक्त ऐकले होते, आज मी पाहिले सुद्धा की कावळा खोटारडेला चावतो!’
हे वृत्त लिहेपर्यंत 7000 हून अधिक लोकांनी या ट्विटला लाईक केले आहे. याशिवाय 2000 हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. सोशल मीडियावर अनेक लोक या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. संजय सिंह यांच्या निलंबनानंतर राघव चढ्ढा हे मोदी सरकारवर सतत हल्लाबोल करत आहेत. मंगळवारी त्यांनी मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.