वेध
– प्रफुल्ल व्यास
kasaba chinchwad पुण्यातील दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल भारतीय जनता पार्टीसाठी संमिश्र आहे. kasaba chinchwad कसबा मतदारसंघात झालेला पराभव दु:ख देणारा तर चिंचवड मतदारसंघात मिळालेला विजय आनंद व दिलासा देणारा आहे. कसबा मतदारसंघाचे नेतृत्व यापूर्वी मुक्ता टिळक करीत होत्या. पण, त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे तिथे पोटनिवडणूक झाली आणि उमेदवाराची निवड करताना भारतीय जनता पार्टीची मोठी दमछाक झाली. kasaba chinchwad उमेदवारी कुणाला द्यावी, यावरून पक्षात प्रचंड खल झाला. शेवटी हेमंत रासने यांना उमेदवार म्हणून निवडण्यात आले. उमेदवारी एकतर टिळक कुटुंबातील सदस्याला द्यायला पाहिजे होती किंवा मग टिळक सुचवतील त्या व्यक्तीला, अशी मागणी जोर धरत होती. पण, पक्ष नेतृत्वाने रासने यांना उमेदवारी दिली. kasaba chinchwad त्यांच्यासाठी संपूर्ण पक्ष झटला, प्रचार केला, मेळावे घेतले, सभा घेतल्या, सगळे काही इमानेइतबारे झाले. भाजपाने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. kasaba chinchwad कारण, हा मतदारसंघ भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जात होता. या मतदारसंघावर तब्बल तीन दशकं भाजपाचे वर्चस्व होते.
पुण्याचे सध्याचे खासदार गिरीश बापट यांनी या मतदारसंघाचे दीर्घकाळ नेतृत्व करीत हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला बनविला होता. पण, यंदा कुठे माशी शिंकली माहिती नाही, हा बालेकिल्ला ढासळला. दिवंगत मुक्ता टिळक ह्या पुण्याच्या महापौर होत्या. त्यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात उत्तम काम केले होते. kasaba chinchwad त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या कसब्यातून निवडून आल्या आणि आमदार झाल्या. बराच काळ त्या आजारी होत्या. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा कुणाल याला वा मग पती शैलेश यांना उमेदवारी द्यावी, या मागणीने जोर धरला होता. ब्राह्मण हा एक घटक महत्त्वाचा होताच. पण, पक्षाने वेगळा विचार केला आणि रासनेंना मैदानात उतरविले. kasaba chinchwad तसा भाजपाचा पराभव फार मतांनी झालेला नाही. मात्र, पराभव हा पराभवच असतो आणि तो स्वीकारून पराभवामागची कारणे शोधून २०२४ साली होणाèया निवडणुकीत विजय मिळविण्याच्या दृष्टीने भाजपाला उपाय करावे लागणार आहेत. kasaba chinchwad या पराभवावर पक्षाकडून आत्मचिंतन केले जाईलच, यात शंका नाही. कसबा मतदारसंघांतर्गत सदाशिवपेठ, भवानीपेठ यांसारख्या ज्या पेठा येतात, त्या पेठांमध्येही भाजपाला यावेळी मतांच्या बेगमीसाठी परिश्रम घ्यावे लागले. kasaba chinchwad तथापि, ते फार यशस्वी होऊ शकले नाहीत, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
उमेदवाराची निवड चुकली, हेही भाजपाला मान्य करावे लागेल. kasaba chinchwad पेठांमध्ये मतदानाची टक्केवारी का घसरली, भाजपा समर्थक मतदार मोठ्या संख्येत घराबाहेर का पडले नाहीत, याबाबतही पक्षाला चिंतन करावे लागणार आहे. शिवाय, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला व त्यांच्यासाठी एकत्रित कामही केले. भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली पाहिजे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जर हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढले तर भाजपापुढे निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. kasaba chinchwad महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे आज जे संख्याबळ विधानसभेत आहे, त्याचा विचार करता त्यांच्यासाठी जागा वाटप करणे सोपे नसेलही; पण कठीणही नाही. kasaba chinchwad भाजपाला पराभूत करायचेच या एका मुद्यावर हे तीन पक्ष आपसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कसब्यात झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपाला आतापासूनच पुढची व्यूहरचना करावी लागणार आहे. kasaba chinchwad पिंपरी-चिंचवड मतदारसंघात भाजपाच्या अश्विनी जगताप ह्या विजयी झाल्या आहेत.
अपक्ष राहुल कलाटे यांना मिळालेली मते विचारात घेतली तर अश्विनी जगताप यांचा विजयसुद्धा भाजपाला फार आनंद देऊ शकत नाही. kasaba chinchwad चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली नसती, अजित पवारांचे ऐकले नसते तर तिथेही भाजपाला विजय मिळविणे अवघडच होते, हे मान्य करावे लागेल. kasaba chinchwad राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तिथे संपूर्ण शक्ती पणाला लावल्यानंतरही त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले, त्यामागचे एकमेव कारण म्हणजे कलाटे यांची बंडखोरी हेच आहे. दुसरे कारण जगताप कुटुंबाने केलेली जनहिताची कामे होय. लक्ष्मण जगताप हे या मतदारसंघाचे आमदार होते. पण, त्यांचेही दुर्दैवी निधन झाल्याने पोटनिवडणूक घ्यावी लागली. kasaba chinchwad या मतदारसंघात उमेदवाराची निवड भाजपाने अचूक केली. kasaba chinchwad त्यामुळे मतदारांमध्ये आणि भाजपाच्या समर्थकांमध्ये कोणतीही नाराजी दिसून आली नाही, हे बरे झाले. एकुणात, भाजपाला विजय आणि पराजय या दोन्हींच्या बाबतीत गंभीर आत्मचिंतन करावे लागेल, हे निश्चित!