---Advertisement---

खडसे-महाजन आरोप-प्रत्यारोप प्रकरण, बोदवडात खडसेंच्या प्रतिमेला फासलं शेण

---Advertisement---

बोदवड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी नुकतेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेय. हे आरोप बिनबुडाचे असून, खडसे यांच्यात ऐकही गुण नाही. खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत येथील भारतीय जनता पार्टीने खडसेंच्या प्रतिमेला शेण फासून निषेध व्यक्त केला.

जळगाव जिल्हात सध्या दोन्ही नेत्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असून, याचे पडसाड आज बोदवड येथे उमटले. बोदवड भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाच्या कार्यालयात संध्याकाळी पत्रकार परिषदेत घेण्यात आली. या वेळी एकनाथ खडसे हे जेष्ठ नेते असून, त्यांच्या सारख्या जैष्ठ नेत्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून, ते तथ्यहिन आहे.

महाराष्टाचे मुख्यमंत्र्याची स्वप्न पाहणारे खडसे यांच्यात ऐकही गुण मुख्यमंत्र्याचा नाही, अशी टीका करण्यात आली. तसेच खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

निवळ राजकीय द्वेशापोटी खडसेंचे आरोप

तसेच निवळ राजकीय द्वेशापोटी खडसे आरोप करत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मधुकर राने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी नगरसेवक विजय बडगुजर, भरतअप्पा पाटील, रुपेश गांधी, अमोल देशमुख, अमोल शिरपुरकर, परमेश्वर टिकारे, धनराज सुतार, पुंडलिक पाटील, भागवत टिकारे, राजेंद्र टापसे, संजय अग्रवाल, सुधिर पाटील, विजय पालवे, महेद्र पाटील, अभिषेक झांबड, राहुल माळी, उमेश पाटील, पंकज डिके, संतोष चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment