तरुण भारत लाईव्ह । लखनऊ : यूपीमधील नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यूपीमध्ये ४ मे आणि ११ मे रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. येथे 17 महानगरपालिका, 199 नगरपालिका आणि 544 नगर पंचायतीच्या जागा आहेत.यूपी नगरपालिकेत 199 पैकी 97 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर सपा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या टप्प्यात ५२ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ५३ टक्के मतदान झाले होते. यूपीच्या नागरी निवडणुका 2024 ची लिटमस टेस्ट मानली जात आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप, सपा, बसपा, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. यूपीमध्ये 17 महानगरपालिका, 199 नगरपालिका आणि 544 नगर पंचायतीच्या जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 9 मंडलांतील 37 जिल्ह्यांतील 10 महानगरपालिका, 820 नगरसेवक, 103 नगरपरिषद अध्यक्ष, 2740 नगरपरिषद सदस्य, 275 नगर पंचायत अध्यक्ष आणि 3745 नगर पंचायत सदस्यांसाठी निवडणूक झाली आहे. दुसरीकडे, दुसऱ्या टप्प्यात 9 विभागांतील 38 जिल्ह्यांतील 7 महानगरपालिका, 95 नगरपालिका, 267 नगर पंचायती आणि नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक झाली.