मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले.
त्यामुळे या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळणार की, जनमत विरोधात जाऊन काँग्रेस सत्तेवर येणार याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे.
आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. २३० विधानसभा मतदारसंघाच्या या राज्यात जनता नेमकी कुणाला कौल देते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपा पुढे, तर काँग्रेस मागे; कमलनाथ म्हणाले, “मी निकालाचे सुरुवातीचे कल बघितलेले नाहीत. ११ वाजेपर्यंत मी कोणताही कल पाहणं गरजेचं नाही. मला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल याबाबत अगदी आत्मविश्वास आहे. माझा मध्य प्रदेशच्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. किती जागा येणार याचा अंदाज मी करत नाही. मी मतदारांच्या मताकडे लक्ष देतो.
– कमलनाथ सिंह