काळा चणा चाट रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १५ मे २०२३। काळे चणे किंवा हरभ-याच्या दाण्यांची चव खमंग आणि चटपटीत असते. काळ्या चण्यांचे चाट हिरव्या मिरच्या घालून सर्व्ह केले जाते. काळा चणा चाट घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
1 कप काळे चणे, 1 कप धणे चटणी, 4 चमचे चिंचेची पेस्ट, 1.2 कप कोथिंबीरीची पाने, 1 चमचे चाट मसाला, 1 चमचे मिरची पावडर, 1 कप योगर्ट, 1 कप बूंदी, 1 कप बटाटा वेफर्स, 1 लीटर पाणी, आवश्यकतेनुसार मीठ

कृती 
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये काळे चणे स्वच्छ पाण्याने धुवून ७ ते ८ तासांसाठी भिजत घाला. कुकरमध्ये भिजवलेले चणे घालून त्यामध्ये २ ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. पुढे कुकरच्या ६ ते ७ शिट्ट्या करुन चणे चांगले शिजवून घ्या. आता शिजवलेले चणे सामान्य तापमानावर थंड करुन घ्या. आता शिजवलेले चणे एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यावर चिप्स, दही, पुदीना-कोथिंबीरीची हिरवी चटणी, चिंचेची चटणी, लाल तिखट, चाट मसाला, बुंदी मिक्स करा. पुढे, बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने आणि चिंचेच्या चटणीने चाटची गार्निशिंग करा. अशारितीने तयार झालं आहे आपलं चमचमीत काळ्या चण्याचं चाट!