---Advertisement---

पती गोरवर्धन परिक्रमासाठी गेला; इकडे पत्नी आणि दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह

---Advertisement---

मध्य प्रदेश : शिवपुरी जिल्ह्यातील एका गावात २७ वर्षीय महिलेसह तिच्या दोन मुलांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे.

शिवपुरीच्या बैराड पोलीस स्टेशन हद्दीतील जौराई गावात राहणारा रामनिवास बघेल हा त्याचा मेहुण्यासोबत गोवर्धन पर्वताची परिक्रमा करण्यासाठी वृंदावनला गेला होता. पत्नी पिंकी (२७), मुलगी रुचिका (४) आणि ७ महिन्यांचा मुलगा अंगद घरी होते. दरम्यान, बुधवारी रात्री पिंकी आणि तिची मुले घरी झोपली होती, परंतु गुरुवारी सकाळी तिघांचेही मृतदेह घरासमोरील विहिरीत तरंगताना आढळले. विहिरीत मृतदेह पाहताच कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

---Advertisement---

त्यांनी तात्काळ बैराड पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विहिरीतून तीन मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी शिवपुरी येथे पाठवले. सध्या महिलेसह दोन मुलांचा मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण प्रकरणातील विशेष म्हणजे महिलेसह दोन्ही मुले घरात झोपली होती. या प्रकरणात खून आणि आत्महत्या या दोन्ही पैलूंचा तपास पोलिस करत आहेत.

घटनेपूर्वी पती-पत्नीत संभाषण

या घटनेवर ना सासरचे लोक काहीही बोलण्यास तयार आहेत ना पती. गावकऱ्यांच्या मते, महिलेने बुधवारी तिच्या पालकांना फोन करून काही समस्येबद्दल चर्चा केली होती. याशिवाय, घटनेपूर्वी पती-पत्नीतही संभाषण झाले होते, परंतु महिलेने दोन्ही ठिकाणी फोन करून काय बोलले याबद्दल कोणीही बोलत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---