कल्याणनंतर पुणे हादरलं! दोन सख्ख्या बहिणींचे आढळले मृतदेह

#image_title

पुणे ।  कल्याणमधील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच, पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

आठ आणि नऊ वर्षीय अशा दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोघीही बहिणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले होते.

राजगुरुनगर शहरातून दोघी बहिणी काल बेपत्ता झाल्या होत्या. काल दुपारी घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहलालगत एका इमारतीच्या बाजुला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले होते. दोघी बहिणींचे मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांना एकच धक्का बसला.

तपासादरम्यान, त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आचारीने या हत्यांची कबुली दिली आहे. त्याने गोड बोलून दोन्ही बहिणींना आपल्या घरात आणले आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यामुळे, त्याने दोघींचीही हत्या केली आणि मृतदेह ड्रममध्ये ठेवले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहेत.

दरम्यान, कल्याणमधील घटनेतही अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर हत्या केली गेली असून, त्यात मुख्य आरोपी आणि त्याची पत्नी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.