खुशखबर ! बोदवडला ‘सुरत-अमरावती’ तर रावेरला ‘दानापूर’चा थांबा

---Advertisement---

 

जळगाव : बोदवड रेल्वे स्थानकावर सुरत-अमरावती एक्स्प्रेसला तर रावेर येथे दानापूर एक्स्प्रेसला थांबा मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात सुरू झालेली व गेल्या कोरोना काळात २०२० पासून बोदवड रेल्वे स्थानकावर थांबा बंद झालेली अप २०९२६ अमरावती-सुरत व डाऊन २०९२५ या दोन्ही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होती.

या गाडीसह डाऊन १२१४९ पुणे-दानापूर व अप दानापूर-पुणे या गाडीला रावेर रेल्वे स्थानकवर थांबा देण्याची मागणी क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे केली होती. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे.

मात्र वरील गाड्या नेमक्या कोणत्या याबाबत दिवसांपासून थांबतील, अद्याप रेल्वे विभागाकडून पत्र आलेले नाही. आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात येऊन लवकरच थांबा सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे मंत्री रक्षा खडसे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---