---Advertisement---

हिंगणे शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय

---Advertisement---

बोदवड : तालुक्यातील हिंगणे शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडालीय. शरद अशोक पाटील (वय ३५, रा. हिंगणे ता. बोदवड) असे मयत तरुणाचे नाव असून, मृताच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

बोदवड तालुक्यातील हिंगणे येथे मयत शरद अशोक पाटील (वय ३५ ) आपल्या कुटुंबीयांचं वास्तव्याला होते. दरम्यान, शरद पाटील हे गुरुवार, २७ मार्च रोजी पहाटे २ वाजता हिंगणा शिवारातील अधिराज ढाबाजवळ बेशुद्ध स्थितीत आढळून आले. त्यांना तात्काळ बोदवड रुग्णालयात नेण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. घटनास्थळी बोदवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरविंद भोळे व त्यांचे सहकारी दाखल झाले होते. घटनेचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत आहेत.

शरद पाटील यांच्या डोक्याला जखमा
दरम्यान, मयत शरद पाटील यांच्या डोक्याला जखमा असल्यांचे आढळून आल्याने नातेवाईकांनी त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे हिंगणे गावात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment