डोंगरकोठार शिवारात आढळला बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह, वनविभागाकडून तपास सुरू

---Advertisement---

 

डोंगर कठोरा, ता. यावल : येथील गायरान शिवारात काही दिवसांपूर्वी दिसलेल्या मादी बिबट्या आणि तिच्या दोन पिल्लांपैकी एका पिल्लाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

रविवारी सायंकाळी गायरान भागातील सांगवी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतात, केळीच्या क्षेत्रात सुमारे साडेतीन महिने वयोगटातील बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत असल्याचे शेतकरी सचिन दत्तू बावस्कर यांना दिसले.

या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली असता सहायक वनसंरक्षक समाधान पाटील, यावल प्रादेशिक वनविभागाचे पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वनपाल आय.एस. तडवी यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृत बिबट्याचे पिल्लू यावल येथे आणले.

या बिबट्याच्या पिल्लावर सोमवारी शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदनानंतर पिल्लाच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती यावल पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---