तळोद्यात आढळला विवाहित महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

तळोदा : तालुक्यातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील नळगव्हाण गावाच्या स्मशानभूमी जवळ एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दि. १३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वंदना राकेश वसावे या महिलेचा मृतदेह वाल्लेरी नदीच्या तिरावर असलेल्या गावाच्या स्मशानभूमी जवळ आढळला. घटनेची माहिती मिळताच नळगव्हाण गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मयत महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्याने तिचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर घटनेची नोंद तळोदा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीसांनी तपासाच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत.

वंदना राकेश वसावे या सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कार्यरत होत्या तसेच गणेश बुधावल येथे आरोग्य सेविका म्हणूनही काम पाहत होत्या. त्यांच्या मागे दोन अपत्य आहेत. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत.