---Advertisement---

गिरणा डाव्या कालव्यात वाहून गेलेल्या युवकाचा अखेर आढळला मृतदेह

---Advertisement---

जळगाव : पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील सचिन रामू सोनवणे हा युवक चैत्र पौर्णिमेनिमित्त पायी वारीने सप्तशृंग गडावर जात होता. दरम्यान, खेडगाव बुद्रुक ता.भडगाव नजीकच्या गिरणा डाव्या कालवा चारीत पाय घसरून पडल्याने पाटात वाहून गेला. या वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह भडगाव तालुक्यात वलवाडी पाटचारीत आढळून आला.

पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील रहिवासी सचिन रामू सोनवणे हा युवक मित्रांसह शनिवार 5 एप्रिल रोजी चैत्र नवरात्री पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगीगडावर पायी जात होता. दरम्यान सायंकाळ झाल्यामुळे या युवकांचा गट भडगाव तालुक्यात खेडगाव येथे पाटचारीनजीकच्या शाळेत शनिवार 5 रोजी मुक्कामाला थांबला होता. सकाळी उठल्यानंतर हातपाय धुण्यासाठी पाटचारीजवळ गेला असता पाय घसरून सचिन सोनवणे कालव्याच्या पाण्यात पडला.

या ठिकाणी पाटचारी धबधब्यासारखी खोल असून पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने सचिन सोनवणे या कालव्यात वाहून गेला. सोबतच्या मित्रांना आरडाओरड केल्यानंतर खेडगाव येथील इंदिरानगर परिसरातील नागरिक व त्याच्या मित्रांनी बऱ्याच लांबवर शोध घेतला.

परंतु आढळून न आल्याने भडगाव पोलीस ठाण्यात माहिती देण्यात येवून गिरणा डाव्या कालव्यातील आवर्तनाचा प्रवाह रविवार दुपारनंतर बंद करण्यात आला असल्याची माहिती भडगाव पाटबंधारे उपविभागीय अभियंता पी.टी.पाटील यांनी दिली.

त्यानंतर सोमवारी पहाटेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील वलवाडी गावाजवळ सचिन सोनवणे या युवकाचा मृतदेह आढळून आला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment