तरुण भारत लाईव्ह ।२८ फेब्रुवारी २०२३। तामिळनाडू मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पावाचा तुकडा घशात अडकल्याने एका बॉडीबिल्डर चा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एम हरीहरन असे मयत तरुणाचे नाव आहे.
पावाचा तुकडा घशात अडकल्याने बॉडीबिल्डरचा मृत्यू
by Mugdha Bhure
Published On: फेब्रुवारी 28, 2023 3:40 pm

---Advertisement---
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील वडालूर इथे 21 वर्षीय एम हरीहरन राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण घेत होता. वर्कआऊट दरम्यान त्यानं ब्रेक घेतला आणि रोटी खायला सुरुवात केली. पण, ब्रेडचा तुकडा घशात अडकल्यामुळं गुदमरल्यानं त्याचा मृत्यू झाला. एम हरीहरन हे सालेम जिल्ह्यातील पेरिया कोलापट्टीचा रहिवासी होता. एम हरिहरन वडालूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी तयारी करत होता. यासाठी तो जिममध्ये प्रशिक्षण घेत होता.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून स्पर्धक कुड्डालोरमध्ये आले होते. हे सगळे स्पर्धक एका लग्नमंडपात थांबले होते. हरीहरन हा रविवारी रात्री आठच्या सुमारास व्यायाम करत होता. व्यायम करत असताना घेतलेल्या अल्पविश्रांतीच्यावेळी तो पाव खात होता. पाव खाताना पावाचा मोठा तुकडा त्याच्या घशात अडकला. पाव अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. गुदरमरल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथं नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.