---Advertisement---

बोगस शिक्षक भरतीद्वारे सरकारी तिजोरीवर कोट्यवधींचा डल्ला, जळगावात केव्हा होणार चौकशी ?

---Advertisement---

चेतन साखरे
जळगाव :
सन २०१७ पासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांनाही जळगाव जिल्ह्यात बँकडेटेड बोगस शिक्षक भरती करून सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रूपयांचा डल्ला मारला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकारी आणि काही संस्थाचालकही सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य शासनाने सन २०१३ पासून टीईटी परिक्षेद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली. त्यानंतर २०१७ पासून शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियाच बंद आहे. असे असतांना जळगाव जिल्ह्यात सन २०१२ ते २०२५ या कालावधीत जवळपास ५०० ते ६०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ही बॅकडेटेड करण्यात आली असल्याची बाब उघडकीस आली आहे. दोन वर्ष शिक्षण सेवक दाखवून संबंधिताला ‘कायम’चे नियुक्त पत्र देऊन ते शिक्षणाधिकारी मार्फत वेतन पथक आणि शिक्षण उपसंचालक यांच्या संशयास्पद कोऱ्या कागदावरील स्वाक्षरीनिशी मंजूर करण्यात आल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशी आहे मोडस ऑपरेंडी

शिक्षक भरतीची पध्दती अत्यंत नमुनेदार आहे यातशिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्ह्याजिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी कार्यालये व वेतन पथक या तीन कार्यालयांची साखळी त्यामागे आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थाचालकांच्या रूपातील बकरे हेरायचे, मग दलालांनी संस्थाचालकांशी संपर्क साधायचा, बेरोजगारांकडून २० लाखांपासून ४० लाखांपर्यंतच्या रकमा उकळायच्या, रक्कम किती आहे यावर शिक्षक आणि लिपिक, शिपाई वगैरे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नियुक्त करायचे, त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी मंजूर करायचा, उपसंचालकांच्या कार्यालयाने त्यावर शिक्कामोर्तब करायचे आणि अखेरीस त्यांचा शालार्थ आयडी तयार करून त्याआधारे पगारपत्रक वेतन अधीक्षक कार्यालयाकडे पाठवायचे, अशी ही मोडस ऑपरेंडी आहे.

अमळनेर ते शेंदुर्णी कनेक्शन जळगाव जिल्ह्यात झालेल्या पा बोगस शिक्षक भरतीचे अमळनेर कनेक्शन उजेडात येत आहे. या तालुक्यातील एक एजंट भरती प्रक्रियेच्या फाईली फिरविण्यात माहिर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच शेंदुर्णी येथील एका मोठ्या शिक्षणसंस्थेत अशाच पध्दतीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचान्यांची भरती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.

विदर्भात चौकशी, जळगावात केव्हा होणार?

पावसाळी अधिवेशनात नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यावर शिक्षणमंत्री दादा भुसे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. मात्र हा प्रकार केवळ विदर्भापुरताच मर्यादीत नसून जळगाव जिल्ह्यातही ते घडले असल्याने जळगावची चौकशी केव्हा होणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---