Bollywood : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना चेक बाऊंस प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांच्या शिक्षाची सुनावताना न्यायालयाने चेकच्या दुप्पट रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
घायल आणि घातक सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने चेक बाऊंस प्रकरणात शनिवारी (दि.17) शिक्षा सुनावली.
संतोषी यांनी जामनगर येथील व्यावसायिक अशोकलाल यांच्याकडून 1 कोटी रुपये घेतले होते. मात्र ते परतच केले नाहीत. यानंतर अशोकलाल राजकुमार संतोषी यांच्याविरोधात न्यायालयात गेले होते.
2015 मध्ये संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून 1 कोटी रुपये उधार घेतले होते. ही रक्कम परत करताना राजकुमार संतोषी यांनी अशोकलाल यांना 10 लाखांचे 10 चेक दिले. जे 2016 मध्ये बाऊंस झाले होते.
अशोकलाल यांनी जामनगर न्यायालयात धाव घेतली. बाऊंस झालेल्या प्रत्येक चेकसाठी संतोषी यांना 15 हजार द्यावे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, आता न्यायालयाने कठोर निर्णय घेतलाय. प्रत्येक चेकच्या दुप्पट रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.