---Advertisement---

मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालयावर बॉम्बहल्ल्याची धमकी; मुंबईत खळबळ

---Advertisement---

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपवर मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा संदेश पाकिस्तानमधील एका क्रमांकावरून पाठवण्यात आला असून, त्यानंतर सुरक्षाव्यवस्थेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांना एक व्हॉट्सअप संदेश प्राप्त झाला, ज्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे सांगितले आहे. मात्र, हा इसम भारतातील आहे की परदेशातील, याचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणांनी सुरू केले आहे.

हेही वाचा सेवानिवृत्त सैनिकाने मुलाचा खून करून घेतला गळफास; कारण आलं समोर

संदेश प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या. गुप्तचर यंत्रणांनीही तपास सुरू केला असून, संदेश पाठवणाऱ्या क्रमांकाचा तपशील काढण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात हा क्रमांक पाकिस्तानमधील असल्याचे आढळले आहे. त्यामुळे हा मेसेज प्रक्षोभक हेतूने पाठवण्यात आला आहे का, याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच, हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी सायबर क्राइम विभागालाही सतर्क करण्यात आले आहे.

राज्यात याआधीही अनेकांना धमक्या आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली असून, संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी खबरदारीचे उपाय योजले जात आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment