Video । बुमराहसमोर चुकीला वाव नाही, पर्थमध्ये दिसला ‘ट्रेलर’

#image_title

Border Gavaskar Trophy 2024 ।  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी उद्या २२ नोव्हेंबरपासून पर्थवर खेळवली जाणार आहे. पॅट कमिन्स व जसप्रीत बुमराह या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आज ट्रॉफीसोबत फोटोसेशन केले तसेच पत्रकार परिषदही घेतली. यावेळी भारताचे कर्णधारपद भूषवणाऱ्या जसप्रीत बुमराहने आपल्यासमोर कोणतीही चूक झाल्यास खपवून घेणार नसल्याचे सांगितले आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीतच्या खांद्यावर कर्णधाराची जबाबदारी आहे आणि त्याची ही कॅप्टन म्हणून दुसरीच कसोटी असणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार बनणे, हे खूप मोठं भाग्य असल्याचे जसप्रीतने पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्याने विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या नेतृत्व कौशल्यापेक्षा वेगळी शैली वापरणार असल्याचे स्पष्ट केले.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी बॉर्डर गावस्कर मालिकेत ४-० असा विजय मिळवायचा आहे. जसप्रीत बुमराहसमोर संघाला मालिकेत दमदार सुरुवात करून देण्याचे आव्हान असणार आहे.

बुमराहने हे आव्हान स्वीकरले आहे आणि जबाबदारी घेण्यासाठी तयार असल्याचे मत त्याने मांडले आहे. रोहित अजूनही ऑस्ट्रेलियात दाखल झालेला नाही. ‘हे माझ्य भाग्य समजतो. मला माझी शैली आवडते.

विराट कोहलीचे नेतृत्व वेगळ्या शैलीचे होते, रोहितचेही वेगळे आहे आणि माझी स्वतःची वेगळी शैली आहे. कर्णधारपद हा एक विशेषाधिकार आहे. मला जबाबदारी घ्यायला आवडते,’ असे जसप्रीतने सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले.