बॉक्सर मेरी कोमने मागितली PM मोदींकडे मदत, वाचा सविस्तर

मणिपूर : मणिपूरमध्ये मेईतेई समुदायाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीविरोधात 3 मे रोजी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी आठ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आणि संपूर्ण ईशान्येकडील राज्यात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. दरम्यान, भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.

1https://twitter.com/MangteC/status/1653871522011045888/photo/1

काय म्हणाल्या मेरी कोम? 

मेरी कोमने ट्विट करत लिहिले की, “माझे राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा.” या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूर मधील फोटो शेअर केले आहेत.