Pune Crime News : प्रियकराने केली प्रेयसीच्या गाड्यांची जाळपोळ, जनता वसाहतीत ५० हून अधिक वाहनांची तोडफोड

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीच्या ब्रेकअपनंतर तिच्या दोन वाहनांची जाळपोळ केली. या प्रकरणी आरोपी अमजद पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पठाण आणि त्याच्या प्रेयसीच्या प्रेम संबंध होते.  मात्र, त्याच्या प्रेयसीने त्याच्याशी बोलायला बंद केल्याने पठाण रागाने तिच्या घरासमोर असलेल्या दोन गाड्या पेट्रोल टाकून जाळून टाकल्या. या घटनेची माहिती मिळताच, पुणे पोलिसांनी आरोपी अमजद पठाणला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनता वसाहतीत वाहनांची तोडफोड

पुण्यातील जनता वसाहतीत एका रात्री अज्ञात व्यक्तींनी ५० हून अधिक वाहनांची तोडफोड केली. मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडली. तलवार, कोयता, तसेच बांबूने गाड्यांची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड दोन गटांतील जुन्या वादामुळे झाली असल्याची माहिती समोर आली आहे.पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तब्बल ४० गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वाहन तोडफोडीमुळे स्थानिक नागरिकांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. त्याचबरोबर, स्थानिक पोलिसांनी ‘व्हिजिबल पोलिसिंग’साठी तात्पुरते तपासणी केंद्र उभारले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी ते केंद्र गुंडाळण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक पोलिसांनी या घटना गांभीर्याने घेतल्या नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, पुणे शहरात या दोन्ही घटनाही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. प्रियकराची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड या घटनांनी पुणेकरांना धक्का दिला आहे. आता पोलिस आणि स्थानिक प्रशासन या घटनांच्या गांभीर्याने तपास करत आहेत.